आहुपे येथील भैरवनाथ क्रिकेट क्लब ने पटकाविला आदीवासी चषक

Written by

कोंढवळ गवांदेवाडी येथील अप्पा कारोटे स्टेडियम येथे कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान ने क्रांतिकारक भागोजी येदे आदिवासी चषक भरविला होता यावेळी बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रायबल फोरम चे अध्यक्ष डॉ हरिश खामकर,आहुपे मा सरपंच शंकर लांघी, पोखरी उपसरपंच सचिन भागीत,गोहे सरपंच सोमनाथ गेंगजे,ट्रायबल फोरम महासचिव विशाल दगडे, कोंढवळ पोलीस पाटील सुभाष कारोटे, कोंढवळ सरपंच दीपक चिमटे उपस्थित होते. प्रथम क्रमांक भैरवनाथ क्रिकेट क्लब आहुपे यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सोनवळे,जुन्नर यांनी मिळविला त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक कामळजादेवी क्रिकेट क्लब माळीण यांनी तर चतुर्थ क्रमांक काळभैरवनाथ क्रिकेट क्लब ,न्हावेड यांनी मिळविला.या क्रिकेट स्पर्धेसाठी आदिवासी भागातील 40 संघांनी भाग घेतला.
यावेळी बोलताना डॉ हरीश खामकर म्हणाले की आदिवासी भागात क्रीडापटू तयार व्हावेत यासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम विभागात क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी क्रीडाप्रेमीकडून जोर धरत आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री मा दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहोत सूत्रसंचालन दीपक चिमटे यांनी केले तर मान्यवरांचे आभार सुभाष कारोटे यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन शांताराम कारोटे, महेंद्र कारोटे. विश्वास भवारी, प्रशांत भवारी,प्रशांत डामसे,राम डामसे,शांताराम कारोटे, यांनी केले तर समालोचक म्हणून संजय सातपुते यांनी काम पाहिले अशी माहिती कट्टर आदिवासी प्रतिष्ठान चे अजित कवठे यांनी दिली.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares