२६ डिसेंबर २०२२
मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचे कार्यकत्यांनी स्वागत केले आहे. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, चार भीतीच्या आत बसलो, घरात बसल तर लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना कशा कळणार? लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर काम करावं लागतं, लोकांमध्ये मिसळाव लागतं, कार्कर्त्यांना जपावं लागत असा टोला लगावला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत असतांना आतापर्यंत अनेक सत्तांतर झाली पण हे सत्तांतर ऐतिहासिक, ५० आमदार आणि १३ खासदार निघून गेले याबाबत आत्मपरीक्षण करायला हवं, लोकं का चाललेत याचा विचार केला पाहिजे. काय चुकतंय हे तपासायला हवं, हे डबल इंजिन सरकारचं आहे, चांगलं काम करत आहे, राज्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा केंद्राची मदत लागेल, तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचं काम मोठ्या मनाने हे सरकार करेल असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.
विरोधकांकडे काही प्रश्नच उरले नाहीत, सरकार आल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा लोकांचा ओढा वाढत चाललाय.विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नसल्यानं काहीतरी मुद्दे काढायचे, अभ्यास करायचा नाही, फक्त बेछूट आरोप करत सुटायचे इतकचं त्यांचं काम सुरू असून आरोप करण्यापलीकडे विरोधकांकडे काहीच काम नाहीये असेही शिंदे यांनी म्हंटलं आहे.
Your email address will not be published.

Article Tags:
news