आम्ही जिजाऊंच्या लेकी प्रतिष्ठानच्या वतीने ओझर येथे शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Written by
आम्ही जिजाऊंच्या लेकी प्रतिष्ठानच्या वतीने ओझर येथे शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

“आम्ही जिजाऊंच्या लेकी” जुन्नर तालुका- महाराष्ट्र राज्य या युवती व महिला प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाली. विघ्नहर देवस्थानचे पदाधिकारी मंगेश मांडे ,कैलास घेगडे यांच्या हस्ते बाप्पांच्या मंदिरापुढे श्रीफळ वाढून या भव्य बाइक रॅलीला सुरुवात करण्यात आली. विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे सर्व युवती व महिला एकत्र येऊन या शिवकन्या बाईक रॅलीसाठी आपली विशेष उपस्थिती दाखवली. या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण म्हणजे कह्राड जिल्हा सातारा येथील “रणधुरंदर” ग्रुपच्या तरुणांनी अतिशय चित्तथरारक शिवकालीन साहसी दृश्ये दाखवून ओझरकरांची मने जिंकली. जवळ जवळ पाचशे ते हजार महिलांनी या शिवकन्या बाईक रॅली साठी आपला विशेष सहभाग नोंदविला होता.

तडम -ताशाचा आवाज ,ग्रामस्थांचा लेझमाचा डाव व महिला भगिनींचा फुगड्यांचा घेर यामुळे वातावरणात एक प्रकारचा आनंदाचा माहोल या ठिकाणी तयार झाला होता.जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.एक प्रकारचा शिवमय माहोल या ठिकाणी तयार झाला होता.ही शिवजयंती शिवकन्या बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट,दोन्ही गावचे सरपंच- उपसरपंच व ओझरकर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Article Categories:
All News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares