आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईकडे रवाना

Written by

शैलेश जाधव
बातमी प्रतिनिधी 
१० जून २०२२
पिपंरी-चिंचवड
महाराष्ट्रात सद्या विधान परिषधेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून एका एका मतासाठी भाजप व महाविकास आघाडी यांच्यात चूरस सुरु असताना चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजपच्या मदतीला धावून जाणार असून विधान परिषधेसाठी मतदान करण्यासाठी आज ते मुंबईला रवाना झाले असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. चिंचवडचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना गेले दीड महिणा बाणेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना अराम करण्यासाठी नुकतेच घरी सोडण्यात आले आहे.
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मतदान करण्यासाठी मुंबईला जाणार कि नाही याबाबत पिपंरी चिंचवड शहरात उलटसुलट चर्चा सुरु होती मात्र सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय घमासान पाहून स्वस्थ बसणार ते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कसले त्यामुळे प्रकृती पूर्ण पणे बरी नसतानाही आपल्या पक्षाला एका मताची गरज लक्ष्यात घेऊन ते आज दिनांक १० जून रोजी सकाळी ०८ वाजता मुंबईला रवाना झाले आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares