रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१६ एप्रिल २०२२
आळेफाटा
आळेफाटा (ता. जुन्नर) पोलीस स्टेशनने ४ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ‘आपले गाव, आपली निगराणी’ या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेअंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये ३६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
याबाबत सविस्तर माहिती, अशी की आळेफाटा हे पुणे-नाशिक, अहमदनगर-कल्याण या मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण असून राष्ट्रीय महामार्गामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी जास्त प्रमाणात असते. तसेच अनुचित प्रकार घडत असल्याने गुन्हेगार गुन्हा करून पळून गेल्यास सीसीटीव्ही अभावी पोलिस तपास संथ होत असल्याने निदर्शनास आल्याने अशा अनुचित प्रकारास आळा बसावा यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गावच्या मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेमध्ये तसेच गावातील रोड कव्हर होतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी चार महिन्यांपूर्वी “आपले गाव, आपले निगराणी” या मोहिमेच्या संकल्पनेतून नागरिक,व्यापारी, पतसंस्था,बँका, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत यांमध्ये मीटिंग घेऊन सीसीटीव्ही बाबतची माहिती मांडली असता अवघ्या ४ महिन्यांमध्ये पोलिसांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गावागावात ३६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
गेल्या वर्षात आळे गावातील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकान हे दरोडेखोरांनी लुटले. या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना तात्काळ केला.तसेच बेल्हे येथील वैष्णवी पतसंस्थेतील ११४ तोळे झालेली सोन्याच्या चोरीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तात्काळ तपास करण्यात आला. सीसीटीव्ही मुळे पोलिसांना तपास करण्यास दिशा मिळते व गुन्ह्याची उकल करण्यास अत्यंत कमी वेळ लागतो.
या मोहिमेअंतर्गत खालील गावांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले.राजुरी ३०,गुंजाळवाडी ८,बेल्हे ४१, गुळुंचवाडी १०,आणे २१, पेमदरा १४, शिंदेवाडी १०, साकोरी २०, मंगरूळ १०, रानमळा ९, झापवाडी ६, नळवणे १२, उंचखडक ३, जाधववाडी ५,बोरी ९,पिंपळवंडी ३८, कोळवाडी १४,वडगाव आनंद ३६,आळे ४५, संतवाडी ७,काळवाडी १३
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news