आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडच्या सभेला परवानगी नाकारली, मात्र श्रीकांत शिंदेच्या सभेला परवानगी

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभेत सिल्लोड नगरपरिषदेने परवानगी नाकारली आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील महावीर चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होणार होते. खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील याच परिसरात सभा होणार आहे. त्यांच्या सभेला मात्र परवानगी मिळाली आहे. दोन्ही सभा आमने सामने होणार असल्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राउंडवर तर आदित्य ठाकरे यांची सभा महावीर चौकात होणार होती.
श्रीकांत शिंदेंची सभा अब्दुल सत्तार यांनी नियोजित केली आहे. दोन्ही सभा जवळ होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली आहे. तर आदित्य ठाकरे यांना आंबेडकर चौक, प्रियदर्शनी चौकाचे पर्याय देण्यात आले आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares