रामदास सांगळे
विभागीय संपादक
१० मार्च २०२२
आणे
आणे (ता.जुन्नर) येथील आरती सुनील सासवडे हिची MPSC अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली असून तिचा ओबीसी संवर्गातून महिलांमधून राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. या परीक्षेत तिने ३४० पैकी २३५ गुण मिळवले आहेत. सासवडे ही MPSC अंतर्गत निवड होणारी गावातील पहीच महिला अधिकारी ठरली असून वयाच्या २४ व्या वर्षी तिने यश मिळवले आहे.
पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आणे व माध्यमिक शिक्षण श्री रंगदास स्वामी माध्यमिक आश्रमशाळा, आणे येथे झाले आहे. तीने शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद येथून बीएससी फॉरेन्सिक सायन्स मधून पदवी मिळवली आहे.
गावातील पहिली महिला अधिकारी
२०१९ मध्ये झाल्या MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेतुन तिचे निवड झाली आहे. शारीरिक चाचणी आणि मुलाखत नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली.हे यश तिने पहिल्याच प्रयत्नात मिळवले असल्याने आणे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते,श्री रंगदास स्वामी देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर,सरदार पटेल हायस्कूल चे मुख्याध्यापक व शिक्षक,वैभव आहेर, गावचे सरपंच श्रीप्रकाश बोरा,पेमदरा गावच्या सरपंच शैला बेलकर,शिंदेवाडी गावचे सरपंच एम.डी.पाटील शिंदे ,नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल आणे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news