आणे येथे विज पडून बारा शेळ्याचा मृत्यु

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१ जुन २०२२
जुन्नर
आणे येथे विज पडून बारा शेळ्याचा मृत्यु
बेल्हे :- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या बुधवार (दि.१) रोजी आलेल्या पावसाने वीज पडून १२ शेळ्यांनाचा मृत्यू झाला आहे.
धोंडिबा कोतवाल व त्यांची पत्नी कमल कोतवाल हे सकाळी दहा वाजता शेळ्या चारण्यासाठी आणे शिवारात गेले होते.
धोंडिबा कोतवाल शेळ्या चारत असताना दुपारी तीन नंतर अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली, पाऊस याला लागला म्हणून शेळ्यांनी निवऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला आणि नेमका त्याच झाडावर विज पडली आणि त्यात धोंडिबा कोतवाल यांच्या आठ आणि शिवाजी कोतवाल यांच्या चार अशा एकूण बारा शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना पण विजेच्या झटक्याचा मुका मार लागल्याचे कमल कोतवाल यांनी सांगितले.
कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे आणि त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे प्रशासणाने ताबडतोब त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी केली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares