आंबेगाव गावठाण येथील माध्यमिक विदयालयात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची १०९ वी जयंती साजरी

Written by

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची १०९ वी जयंती यशवंतराव चव्हाण माध्यमिक विदयालय आंबेगाव गावठाण येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नारोडी केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्रातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक अशोक पारधी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच इ.५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांची सामान्यज्ञान परीक्षा घेण्यात आली.या परिक्षेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक इयत्ता ८ वीचा विदयार्थी सोहम विनायक घोडेकर, द्वितीय क्रमांक रोहित गणेश मंजाळ इ.९वी, तृतीय क्रमांक वैष्णवी एडके इ.८वी , साक्षी संतोष गायकवाड इ.८वी , सायली सुनिल अकले इ.९वी आदिचा समावेश आहे.

लहान गटामध्ये प्रथम क्रमांक अथर्व मंगेश बुरूड,द्वितीय क्रमांक पार्थ सुधीर झावरे , तृतीय क्रमांक धृव सुरेश कापडणीस या विदयार्थीचा आला आहे. या प्रसंगी मुख्यध्यापक अविनाश ठाकूर ,जाईबाई कोकणे , शोभा जाधव , अंजु१ा राऊळ ,अलका चासकर , शर्मिला कोकणे, नारायण काळे, शिवाजी बांगर , संतोष पडवळ,सुनिल बुरसे आदि शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विदयार्थी उपस्थित होते.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares