अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रभर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावर आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र !
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares