अब्दुल सत्तार हिरवा साप आहे; चंद्रकांत खैरेंची टीका

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. त्याला पूर्णपणे गाढल्याशिवाय मी राहणार नाही, असा एकेरी उल्लेख करत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे गुरुवारी ओला दुष्काळ पाहण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला. याबाबत चंद्रकांत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तारांचा एकेरी उल्लेख करत चंद्रकांत खैरे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अब्दुल सत्तारांना गाढण्याचं काम मी करणार आहे. काहीही केलं तरी त्याला निवडून येऊ देणार नाही. त्याने अनेकांना लुबाडलं आहे. अनेक मुस्लिमांच्या जमिनीही त्याने हडपल्या आहेत. याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस कसं सहन करतात? असा माझा प्रश्न आहे. अब्दुल सत्तारांचा बेशिस्तपणा तुम्हाला आवडतो का? मंत्रिमंडळात सत्तारांसारखे मंत्री असल्याने तुमच्या सरकारचं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना ताबोडतोब काढून टाकलं पाहिजे, अशी मागणी मी फडणवीसांकडे करतो, असं खैरे म्हणाले.
 

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares