अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही – जयंत पाटील

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. सुळे यांच्या कुटुंबातील आमदार रोहित पवार, सदानंद सुळे, स्वत: सुप्रिया सुळे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांना पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की या घटनेबाबत अजित पवार यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नकाअशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares