अनिल देशमुख यांची अखेर सुटका; स्वागतासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती

Written by

२८ डिसेंबर २०२२
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर जामीनावर सुटका झाली आहे. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे.अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थिती होते.
न्यायदेवतेने आज न्याय केल्याचं आजचं चित्र आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडी सरकार विरोधात काही करत असेल तर त्याला आधी एजन्सीची भीती दाखवायची.. भुजबळ, राऊत आता देशमुखांचीही केस आपण पाहिली. सव्वा वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलेलं आहे.अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी काय झेललंय, हे मी खूप जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares