अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा; नुकसान भरपाईत दुप्पट वाढ

Written by

१५ डिसेंबर २०२२
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.
नव्या भरपाईनुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत. तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये मिळणार आहेत. नुकसानीची मर्यादाही वाढवली. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे.
राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे सोयाबिय, कापूस यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares